तुळजापुर : कुमार नाईकवाडी

मराठा आरक्षणाच्या लढयात लोकप्रतिनिधींनी मराठा समाज बांधवाना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. जर मराठा क्रांती मोर्चात लोकप्रतिनिधी सामील झाले तर मराठा बांधव म्हणून उपस्थित रहावे आम्ही त्यांचे स्वागतच करु मात्र  मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या बांधवाना राजकारण करायचे नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे सज्जनराव साळुंके यांनी तुळजापुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

तुळजापुर नगरपरिषद कार्यालयात सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सकल मराठा क्रांती मोर्चासाठी दि. ९ आँक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतीत बैठक बोलविण्यात आली होती.  या बैठकीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना फोन द्वारे संपर्क साधुन मराठा क्रांती मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे येणार आहेत, अशी कल्पना दिली होती. ही बातमी वृतपत्रात आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवार दि. ६  रोजी तुळजाभवानी पुजारी मंडळ कार्यालयात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. 

यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चाचे सज्जनराव सांळुके, सुनील नागणे यांनी सांगितले की , नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत सकल मराठा बांधवाना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आला. मात्र आमचा हेतु छत्रपती  संभाजीराजे यांना का आमंत्रण  दिले असा  नाही ? छत्रपती  संभाजी राजे यांना आमंचा विरोध नाही ? परंतु आम्हांला जर विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते, अशी खंत त्यांनी  व्यक्त केली. जर मराठा क्रांती मोर्चासाठी छत्रपती  संभाजी महाराज आले तर  त्यांचे  आम्ही स्वागतच करु. यापुढे लोकप्रतिनिधींनी मराठा समाज बांधवाना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत.जर मराठा क्रांती मोर्चात लोकप्रतिनिधी सामील झाले तर मराठा बांधव म्हणून उपस्थित रहावे आम्ही त्यांचे स्वागतच करु मात्र  मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या बांधवाना राजकारण  करायचे नाही? आमचे एकच लक्ष्य फक्त मराठा आरक्षण आहे.या पुढे राजकीय लोकांनी कोणतेही निर्णय घेताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावेत. या मराठा क्रांती मोर्चास कोणतेही राजकीय स्वरुप आणु नये? राजकीय लोकप्रतिनिधी आले तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा चे समन्वय समितीचे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करणार असे त्यांनी  सांगितले. 

या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय समितीचे सज्जनराव सांळुके, महेश गवळी, जीवनराजे इंगळे, सुनील नागणे, धैर्यशील कापसे, अर्जुन सांळुके, जनहित संघटनेचे अजय सांळुके, आण्णासाहेब क्षिरसागर, दिनेश बागल, अशोक फडतरे,  अलोक शिंदे, चेतन शिंदे,  राम चोपदार, मारुती जाधव आदीसह सकल मराठा  क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top