अचलेर : जय गायकवाड
उमरगा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर, कडदोरा येथे शाळेतील 34 विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्यायपुस्तिका, पेन्सिल तसेच इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कानडे रमेश विस्तार अधिकारी बिट दाळिंब,नंदकुमार चौधरी केंद्रप्रमुख बलसुर,केंद्रीय मुख्याध्यापक पांडुरंग सोमवंशी, तनिष्का ग्रुपच्या अध्यक्षा तथा पालक सविता मुगळे शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी, मुख्याध्यापक.देविदास पावशेरे, माधव देवणे,व्यंकट जाधव, पवनकुमार माळी तसेच सहशिक्षक उमेश खोसे,गुलमल रणखांब उपस्थित होते.
युनेस्को क्लब दिल्ली व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी सहभाग घेतल्याने शाळेलाही सन्मान पत्र मिळाले आहे. स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच शाळेतील वेदांत दत्तात्रय रणखांब या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याने त्याचाही सन्मान करण्यात आला.
रमेश कानडे यांनी बोलताना सांगितले की,शाळेला गावकऱ्यांचे सहकार्य असल्याने शाळा प्रगती करत आहे.विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रामाणिक मार्गाचा अवलंब करावा, त्यामुळे यश नक्कीच मिळेल.
सूत्रसंचालन उमेश खोसे यांनी केले तर आभार श्रीराम पुजारी यांनी मानले.