नळदुर्ग, दि. 30 : महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र ( एम.सी.ई.डी. ) च्या उस्मानाबाद जिल्हा उद्योजकता विकास सल्लागार समितीवर चिकुंद्रा ता. तुळजापूर येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक तथा ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ खंडू कानडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्रद्वारा जिल्हास्तरावर महाराष्ट्र उद्योजकता विकास सल्लागार समिती कक्ष स्थापन करण्यात आला असून सदर समितीवर शैक्षणिक, सामाजिक आणि उदयोजकता विकास मार्गदर्शन, व्यावसायिक प्रशिक्षण व संशोधनाशी संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते.
भैरवनाथ कानडे यांनी आजतागायत शैक्षणिक, सामाजिक कार्याबरोबर उदयोजकता व व्यक्तीमत्व विकास,व्यावसायभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसाय वृध्दीसाठी भाषा विकास व संवाद कौशल्य, नेतृत्व विकास आदी शासकिय व निमशासकीय पातळीवर होणाऱ्या शिक्षण,प्रशिक्षण आणि संशोधनात्मक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
संबधित क्षेत्रातील त्यांचा अनुभव विचारात घेवून सदर समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा महाव्यवस्थापक , जिल्हा उदयोग केंद्र उस्मानाबाद व प्रकल्प अधिकारी , महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद , उस्मानाबाद यांनी कळविले आहे. या निवडीबददल कानडे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.