तुळजापूर : कुमार नाईकवाडी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य तुळजापुर नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी येथील शहरातील कमान वेस भागातील  येथील ऐतिहासिक आहिल्याबाई    होळकर या विहिरीची स्वच्छता करून त्या परिसरातील साफसफाई चे काम हाती घेण्यात आले आहे.

या ऐतिहासिक विहीरी जवळच प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी मुख्याधिकारी आशिष लोकरे नगरसेवक नगरपालिका कर्मचारी आदीसह  मान्यवरांच्या हस्ते पुजन संपन्न झाले.

सदरील स्वच्छता उपक्रमास सकाळी ७ वाजल्या पासुन सुरुवात झाली.  यावेळी युवा नेते विनोद पिटु गंगणे, नगरसेवक नानासाहेब लोंढे, अभिजीत कदम, किशोर साठे, राहुल खपले, रा.काँ चे युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, विकास खपले, काकासाहेब चिवचिवे, हणमंत पुजारी, समाधान जगताप तसेच नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक  वैभव पाठक यांच्यासह नगरपरिषदचेअधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, अग्निशामक, पाणी पुरवठा आदी कर्मचारी उपस्थित होते. सदरील महापुरुषंच्या प्रतिमेचे पुजन हे आहिल्याबाई होळकर विहीरी मध्येच करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


 
Top