तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील जवाहर नवोदय विद्यालयात शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांच्या हस्ते प्रतिमांचे पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व नवोदय परिवारातील मुले उपस्थित होते. कार्यक्रमाचा सुरुवात पुष्पहार अर्पण केल्यानंतर संगीत अध्यापक  पी. एन. जोशी यांच्या द्वारा "रघुपती राघव राजाराम, वैष्णव जन हे तोषावे, जय जवान जय किसान" ही गीते गाऊन प्रारंभ करण्यात आला. या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी वंशिका गुप्ता, अवनी खोब्रागडे, सर्वज्ञ गोमारे, आर्यन मुरकुटे, हर्षदा माने, पार्मी गायकवाड, दिव्या गुप्ता या मुलांनी हिंदी ,इंग्रजी, मराठी या भाषेतून आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी. भोरगे यांनी केले.

 
Top