तुळजापुर : कुमार नाईकवाडी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शुक्रवार दि. २ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक धनंजय पाटील, माजी सभापती दिगंबर खराडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, संदीप गंगणे, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, अप्पासाहेब पवार, विकी घुगे, बाळासाहेब चिखलकर, प्रशांत अपराध आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
