नळदुर्ग : सचिन गायकवाड

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.आर.के. ढोकळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. एन.एम. जाधव,प्रा. टी.एल. दबडे,प्रा. विवेकानंद कुंभार, ग्रंथपाल एस.के. जोगदंडे, लिंबराज मोटे, दत्तात्रय कांबळे, लिंबराज बेले, बारीक शिंदे, सुरेश गायकवाड, भागिनाथ बनसोड, सिद्धाराम सुतार, पत्रकार सचिन गायकवाड आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top