सोलापूर, दि. 02 : भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या दोन तरुणांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली असून त्या दोघा तरुणांकडून बनावट नोटा प्रिंटर आदी साहित्य जप्त केले आहे.
शहरातील शानदार चौक परिसरातील भारत हौसिंग सोसायटीत बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीसांना गुप्तहेरांमार्फत मिळाली. त्यानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून घटनास्थळावरुन विष्णू सिद्राम गायधनकर (रा.भारत हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सोलापूर) याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाखांपर्यंतच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती घेतली जात असल्याचे शेडगे यांनी बोलताना सांगितले.
