नळदुर्ग : सचिन गायकवाड
सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर येथे ९ ऑक्टोंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने ठोक मोर्चा चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे दि. १ ऑक्टोंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम तुळजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने रा. केतुर ता. जि . बीड येथील स्वर्गीय विवेक कल्याण राहाडे या मराठा समाजातील विद्यार्थ्याला सकल मराठा तुळजापूर समाज बांधवांच्या वतीने सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. सकल मराठा समाज बांधवाच्या तालुकास्तरीय बैठकीमध्ये ठोक मोर्चा च्या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच तुळजापूर येथे होणाऱ्या ठोक मोर्चा तुळजापूर तालुका छावा संघटनेच्यावतीने मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे, असे तुळजापूर तालुका छावा संघटनेचे अध्यक्ष लखन मोटे यांनी सांगितले.
यावेळी तुळजापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सज्जनराव साळुंके, महेश गवळी, हरिदास बेले आदींनी ठोक मोर्चा च्या संदर्भात मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी चिकुंद्रा येथील मराठा समाज बांधव गणेश गायकवाड, सागर मोटे, सुधाकर गायकवाड, नितीन गायकवाड, संजय मोटे, बालाजी गायकवाड, जयराम गरड , मोतीराम मोटे, रमेश, गायकवाड, सहदेव गरड, शाहुराज गायकवाड, सुरेश गरड, लिंबराज जाधव, दिगंबर मोटे, तसेच तुळजापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी ९ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने तुळजापूर येथे मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला तुळजापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव तसेच चिकुंद्रा येथील मराठा समाज बांधव व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
