नळदुर्ग, दि. 02 : येडोळा ता. तुळजापूर येथे कोरोना कक्षात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाचा संसर्गजन्य कोरोना आजाराने शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी दिली.

येडोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दयानंद बाबुराव कदम (रा. तुळजापूर, वय 57 वर्षे) यांचा सोलापुर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते येडोळा येथील कोरोना कक्षात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. दयानंद कदम यांचे निधन झाल्याचे समजताच शिक्षकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

 
Top