नळदुर्ग : एस.के. गायकवाड
नुकतेच उत्तर प्रदेश येथे एका दलित तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत ठार मारण्यात आले.सदर निंदनीय घटनेचा निषेध करून पिडीत मुलीच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जात असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा विद्दामान खासदार राहूल गांधी व खा.प्रियंका गांधी यांना धक्का बुक्की करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीसांचा व सत्ताधारी योगी सरकारचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे चावडी चौकात काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच याप्रसंगी देशातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारने मुठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकरी विरोधी कायदा पास केला .सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. व केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा त्वरित रद्द करण्यात यावा असी मागणी करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशातील दलित तरुणीवर बलात्कार प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन सत्ताधारी योगी सरकारने राजीनामा द्यावा आसी मागणी ही यावेळी करण्यात आली .
या संदर्भात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि सुधिर मोठे याना एक लेखी निवेदनदेण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे शहबाज काझी, प्रा. जावेद काझी,शुभद्राताई मुळे, नगरसेवक विनायक अहंकारी, बसवराज धरणे, हामीद कझी, शरीफ शेख शब्बीअल्ली सय्यद, इमाम शेख, मारुती खारवे, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, संदीप सुरवसे,महेंद्र डुकरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
