तुळजापूर, दि. 2 : कुमार नाईकवाडी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सत्य, अहिंसा, समानता,न्याय या तत्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी महात्मा गांधी यांनी आपला देह झिजविला तसेच देशाचे द्वितीय पंतप्रधान ज्यांनी जय जवान जय किसान या घोषणेने देशाच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असे थोर व्यक्तिमत्त्व लाल बहादूर शास्त्री यांना तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे प्राचार्य डॉ एस.एम.मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा.डॉ.विलास गुंडपाटील ,प्रा.आशपाक आतार ,प्रा.गोकुळ बाविस्कर,प्रा.डॉ.नेताजी काळे ग्रंथपाल दिपक निकाळजे, प्रा.श्रीमती सविता कदम,प्रा.संजय पाटील कार्यालयीन कर्मचारी सुमेर कांबळे, गोवर्धन भोंडे , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे यथायोग्य पालन करुन सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
