काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार दि. 2 रोजी "खेड्याकडे चला" या गांधीजींच्या विचारातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच अमिरुद्दीन पटेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित वडणे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
यावेळी सरपंच अमिरुद्दीन पटेल, उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित वडणे, पोलीस पाटील विठ्ठल वडणे, सहशिक्षक पी.व्ही. सुरवसे,आय.पी. शेख, गणेश तांबे, दिनेश क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
