काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवार दि. (2) रोजी सकाळी दहा वाजता साजरी करण्यात आली. 

प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच आदेश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम आगलावे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.     

यावेळी सरपंच आदेश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, मोतीराम आगलावे, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, सतिश देशमुख, सुहास साळुंके,शिवलिंग घाणे,बापु वाडकर, नागनाथ रोडे, अविनाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top