काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती शुक्रवार दि. (2) रोजी सकाळी दहा वाजता साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच अमिरुद्दीन पटेल व तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोटे, उपसरपंच पंडीत वडणे यांच्या हस्ते  पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.     

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत बाबुराव दिलपाक यांच्या वतीने ग्रामस्थांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्या, सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि रोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे सपोनि रोटे, सरपंच अमिरुद्दीन पटेल, उपसरपंच पंडित वडणे पाटील,पोलीस पाटील विठ्ठल वडणे, विश्वजीत दिलपाक, ग्रामसेविका श्रीमती काकडे, सहशिक्षक आय.जी. शेख, पी.व्ही. सुरवसे, आरोग्य कर्मचारी भोजने, बाबुराव दिलपाक, महावीर जानराव, जगन्नाथ गाडेकर, अर्जून चव्हाण, सुहास वडणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top