नळदुर्ग : एस.के. गायकवाड

येथील बसस्थानकात रोजनदारी सफाई कामगार म्हणून काम करणारे आकाश हलालकर यांचा वाढदिवस वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांनी बसस्थानकातच साजरा करून मानवतेचे दर्शन दिले आहे.

जारो रुपये खर्च करून आपल्या मुलाचा किंवा स्वतः चा वाढदिवस साजरा करणारे लोक अनेक आहेत. परंतु रोजनदरीवर काम करणाऱ्या आपल्या सफाई कामगाराचा साध्य पद्धतीने का असेना वाढदिवस साजरा करुन सफाई कमगाराच्या जिवनात आनंद फुलवनारे नळदुर्ग ता.तुळजापूर येथील बसस्थानकाचे वहातुक नियंत्रक महेश डुकरे यांनी बसस्थानक परीसरिची प्रमाणिकपणे स्वच्छता करणारे सफाई कामगार अकाश हलालकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पहार पुष्पगुच्छ देवून केक भरवू वाढदिवस साजरा करून मनवतेचा धर्म जोपसला. याप्रसंगी पत्रकार ईरफान काझी, एस.के.गायकवाड, महिला वाहक वैशाली राठोड, चालक प्रभाकर सराटे, वृतपत्र विक्रते भारत यादगीरे उपस्थित होते.


 
Top