नळदुर्ग, दि. 1 : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने नळदुर्ग बसस्थानक व शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वाहतुक नियंत्रक दीपक डुकरे, ज्योती दस, अनिल हांडे, नगरसेवक दयानंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, मारुती खारवे,विकास कुलकर्णी गुरुजी, दुर्वास बनसोडे, बाबसाहेब बनसोडे, समतीचे अध्यक्ष पद्माकर घोडके, विलास येडगे, सुहास येडगे, मारुती घोडके, लक्ष्मण शेंडगे, अजय फरताळे, शंकर घोडके, अनिल लकडे, स्वच्छता दूत अमोल आदीजण उपस्थित होते.
