नाशिक, दि. 18 : राष्ट्रीय बंजारा विकास मिशन नाशिक जिल्हा कमिटी मध्ये शनिवार दि. 17 ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा व नांदगाव तालुका मिळून एकुण 45 पदाधिकारी यांची निवड करुन राष्ट्रीय सचिव दत्तु जाधव, नाशिक जिल्हा अध्यक्ष गजानन पवार, नाशिक जिल्हा महासचिव विष्णु चव्हाण यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करुन नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गजानन पवार यांनी भुषविले. सदर बैठकीस जिल्हा पदाधिकारी चुनीलाल राठोड, महासचिव विष्णू चव्हाण, सोमनाथ पवार, गोरखनाथ जाधव, सिताराम राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तर ममराज राठोड, तुळशीराम राठोड, नामदेव चव्हाण, रामलाल राठोड, पांडुरंग बाळणोत, संभाजी चव्हाण, पांडुरंग राठोड, रविंद्र राठोड, गोकुळ राठोड, चरणसिंग चव्हाण, गोटीराम जाधव,  कवि गणेश राठोड, तसेच लोढरे, ढेकु कासारी जातेगांव येथील पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बंजारा समाजाला पुर्ण भारत देशात संविधानिक एसटी आरक्षण मिळवण्यासाठी लवकरच मुंबई व दिल्लीत आंदोलनाचा इशारा गजानन पवार यांनी दिला. तर 17 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय बंजारा विकास मिशनचे मुंबईत आंदोलन झाले. त्यावेळेस सरकारने उत्तर देण्यास 15 दिवसाची मुदत मागितली होती. पण अजुन सरकार शांत बसली आहे. पण आता बंजारा समाज व राष्ट्रीय बंजारा विकास मिशन शांत बसणार नाही, याकरीता मुंबईत लवकरच आंदोलन करु, असे मिशनचे राष्ट्रीय सचिव दत्तु जाधव यांनी यावेळी सांगितले.

 
Top