बेंबळी, दि. 08 : उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने अचानक छापा मारुन तिरट नावाचा जुगार खेळणा-या 12 जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी सुमारे 45 हजार रुपये रोख, 12 मोबाईल फोन, 5 मोटारसायकल, 1 सुझूकी स्वीफ्ट कार असे लाखोचे मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. 07.10.2020 रोजी 17.00 वा. सु. चिखली, ता. उस्मानाबाद येथील राजाभाऊ आवटे यांच्या खोलीवर छापा मारला. यावेळी 1)बाळासाहेब खोत 2)अजिंक्य थोरात 3)नागेश पवार 4)हनुमंत क्षिरसागर 5)जुबेर शेख 6)अमीर पठाण 7)लक्ष्मण घुले 8)मदार शेख 9)राम गडदे 10)अतिक वाघमारे 11)नवनाथ शेटे 12)बजरंग पवार असे सर्वजण तीरट हा जुगार खेळतांना आढळले. जुगारात आढळलेल्या एकुण 45,000/-रु. रोख रक्कमेसह जुगार साहित्य, 12 मोबाईल फोन, 5 मोटारसायकल, 1 सुझूकी स्वीफ्ट कार पोलीसांनी जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
