सकल मराठा बांधवाच्या वतीने आरक्षण संदर्भात शुक्रवारी तुळजापुरात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी तुळजापुर शहरातील तमाम मुस्लिम बांधवाच्या वतीने दि. ८ गुरुवार रोजी येथील पुजारी मंडळ कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या टोप्या परिधान करुन सकल मराठा क्रांती मोर्चास मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने पाठींब्याचे पञ देण्यात आले.
या पञात असे म्हटले आहे की, मराठा आरक्षण बाबतीत न्यायालयातील आरक्षण स्थगिती आहे. ती राज्य व केंद्र शासनाने लवकरात लवकर स्थगिती उठवुन मराठा समाज बांधवाना आरक्षण मंजुर करावे. या वेळी सकल मराठा क्रांती मोर्चा च्या समन्वयकास आपल्या पाठींब्याचे पञ देण्यात आले.
या वेळी हाजी गौससाब बागवान, रसुल बागवान, युसुफ शेख, प्रा. आशपाक आत्तार, लालासाहेब तांबोळी, फेरोज पठाण, मोहसीन खान, मुसाभाई नदाफ, आरिफभाई बागवान, मतीन बागवान, रफीक बागवान, वाहेदभाई शेख आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
