नळदुर्ग, दि. ३१ : तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत 30 ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिनाचे औचित्य साधून रामतिर्थ येथे बचतीचे महत्त्व सांगून एसबीआय बँक शाखा नळदुर्ग तर्फे जनधन खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजनेचे फॉर्म भरणे, विमा, योनो अॅप डाऊनलोड करणे, मुद्रा अंतर्गत कर्ज प्रकरण फॉर्म भरणे, अदि कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी एसबीआय बँकेचे मुख्य व्यवस्थापक (FIDSM) उस्मानाबाद मिलिंद जरीपटके, एसबीआय शाखा नळदुर्ग व्यवस्थापक महेंद्र भोर, दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, एसबीआयच्या मंगल गवळी, काश्मीरा पाटील, निळकंठ राठोड, csp संचालक इमरान शेख, लबडे, रामतिर्थचे सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, रामू चव्हाण, गुरूदेव राठोड, अजित राठोड, भूषण पवार, शेषेराव राठोड, योगेश राठोड, सुरेश राठोड, महिला सीआरपी निर्मला राठोड, सीताबाई चव्हाण, वंदना राठोड, मिरा राठोड आदी. महिला बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास राठोड यांनी केले तर आभार बालाजी राठोड यांनी केले.