चिवरी : राजगुरू साखरे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जागृत देवस्थान म्हणून श्री चिवरी महालक्ष्मी देवी मंदिर ओळखले जाते. नवरात्र महोत्सवातच नव्हे तर वर्षभर या ठिकाणी भाविक गर्दी करतात. नळदुर्ग पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या पायथ्याला निसर्गाच्या सानिध्यात देवीचे देखणे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून महिमा पंचक्रोशीत असल्याने नवस बोलण्यासाठी व नवसपूर्तीसाठी भाविक मोठी गर्दी करतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असल्यामुळे देवीचा हा हिरवाईने नटलेला परिसर भाविक आणि पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. 

श्रीक्षेत्र चिवरी  मंदिर  परिसर पावसाळ्यात अतिशय विलोभनीय दिसत आहे, मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून देवीचे मंदिर कोरूना च्या संसर्गाचा काळात बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटक यांना या नयनरम्य वातावरणांना मुकावे लागले आहे. पावसाळ्यात हिरव्या गार वृक्षांनी वेढलेला हा देवीचा डोंगर अतिशय विलोभनीय दिसत आहे. देवीच्या  डोंगर कड्यावरून  हिरवीगार शेती, मध्येच असणारे पाझर तलाव आणि  माथ्यावर काळेकुट्ट ढग असे विलोभनीय दृश्य  मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा  मोह या  मंदिराच्या मार्गावरून जाणाऱ्याना आवरत नाही.

यावर्षी मात्र  हे निसर्गाचे  खुललेले सौंदर्य  पाहण्यासाठी नाव भाविक  न पर्यटक  असे चित्र दिसत आहे तसेच सध्या अधिक मास चालू असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये आपापल्या कुलदैवताची दर्शन घेण्याची प्रथा आहे परंतु यंदा मात्र भाविकांना देवीचे मंदिर बंद असल्यामुळे देवीचे दर्शन घेता येत नाही त्यामुळे भावीकांतुन व स्थानिक व्यापाऱ्यांतुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 
Top