काळेगाव : प्रकाश साखरे
गेल्या पाच-सहा वर्षापासून काळेगाव ता. तुळजापुर हे गाव हे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेला दत्तक नसल्याने ग्रामस्थांना वेगवेगळ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीची लीड बँकेला माहिती देवून कोणती कार्यवाही झाली नाही. वेळोवेळी शिफारस पत्र, विनंती अर्ज, लेखी तोंडी निवेदन देवून ही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापुर तालुक्यातील काळेगाव सह टेलरनगर, दिंडेगाव आदी गावे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत दत्तक नाहीत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे पीककर्ज, मध्यम मुदतीची कर्ज यासह कर्जासाठी गावातील शेतकरी, तरुण, विविध योजनांचे लाभार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळै दैनंदिन व्यवहारासाठी काळेगाव ग्रामस्थांना राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता असून याप्रकरणी वेळोवेळी वरिष्ठाकडे विनंती अर्ज, लेखी निवेदन, शिफारस पत्र देण्यात आल्या. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांतुन संताप व्यक्त केला जात असून काळेगाव साठी दत्तक बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक नेमणुक करण्याची मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.
