काळेगाव : प्रकाश साखरे
काळेगाव ता. तुळजापूर येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हनुमान मंदिरावर बैठक संपन्न झाली. यावेळी अजय साळुंखे हे या बैठकीस प्रमुख म्हणून उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने वेगवेगळ्या नोकरी पासून वंचित रहावे लागत आहे, यासह विविध मुद्यावर साळुंके यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व वेगवेगळे विषय जनतेच्या समोर मांडले. तसेच तुळजापूर येथे दि. 9 ऑक्टोबर रोजी होणा-या मराठा क्रांती ठोक मोर्चास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस नवनाथ टकले, सुजीत काटवटे, संदीप उंबरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
