नळदुर्ग, दि. 04 : मानेवाडी येथील वाळूसाठ्याचा लिलाव होणार आहे माञ याप्रकरणी आनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जून २०१९ मध्ये आठशे ब्रास वाळू जप्त केली असताना फक्त १३८ ब्रास वाळूचा लिलाव होत आहे. मानेवाडी शिवारात असंख्य ठिकाणी वाळूचे अवैध साठे होते ते वाळू माफियांनी महसुल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून लांबवल्याची चर्चा आहे.
तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी शिवारातील बोरी नदीपाञातून अवैध वाळू उपसा होत असल्याची बातमी विविध दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर ८ जून २०१९ रोजी मानेवाडी शिवारात महसुल प्रशासनाने कारवाई करत सुमारे आठशे ब्रास वाळू जप्त केली होती. वर्षभरात याठिकाणची वाळू मोठ्या प्रमाणात तस्करांनी गुपचुप उचलल्याचे समजते. सुमारे सव्वा वर्षानंतर तुळजापूर तहसीलदारांनी या वाळूचा लिलाव सोमवार दि.५ रोजी ११ वाजता ठेवला आहे. माञ या लिलावाच्या नोटीसमध्ये १३८ ब्रासचा उल्लेख असुन बाकी वाळू गेली कुठे? वाळू चोरीस गेली की प्रशासनाकडून वाळू कमी दाखवली जात आहे आसा प्रश्न उपस्थित केला जात असून यामुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडणार आहे.

