काक्रंबा, दि. 4 :  दुचाकी व पिकपिकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावर काक्रंबा ता. तुळजापूर गावाजवळ शनिवार दि. 3 ऑक्टोबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

चंद्रकांत महादेव खराडे (रा. मसला खुर्द, ता. तुळजापूर, वय ४५ वर्षे) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. यातील खराडे आपल्या दुचाकी (क्रं. एमएच १३ सीव्ही २७३४) वरुन लातुरकडे जात होते. वाटेत काक्रंबा ता. तुळजापूर गावानजकी लातुरहुन तुळजापूरकडे येणाऱ्या पिकअपने (एमएच२४ एबी ८७९२) खराडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील खराडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास माळी व एस. एल. मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली.

 
Top