औरंगाबाद, दि. 04 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता दि. ९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदरील परीक्षा दि. २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालय, शैक्षणिक विभाग, संचलित महाविद्यालय व परिसंस्थातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. 1 ऑक्टोबर सुरु होणार होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे सदरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.आता विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक दुसऱ्यांदा जाहीर केले असून दि. 9 ऑक्टोबरपासुन परीक्षा सुरु होणार आहेत.

