नळदुर्ग, दि. 19 : एका गॅरेज समोर दुरुस्तीसाठी थांबलेल्या एका ट्रकचे पुढील दोन्ही डिस्कसह टायर अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना महामार्गावरील नळदुर्ग येथील ठाकरे नगर येथे रविवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे वाहनधारक, चालकात खळबळ उडाली असून रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
नळदुर्ग येथील बालाघाट कॉलेज जवळ असलेल्या ठाकरे नगर येथील कल्याणी गॅरेज या ठिकाणी मनेशसिंग हजारे यांच्या मालकीची अशोक लिलॉन्ड ट्रक (क्रमांक एमएच 06 एसी 110) इंजिन दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसापूर्वी लावले होते. या ट्रकचे दोन्ही नवीन टायर नुकतेच ॲपोलो कंपनीचे (किंमत 31000) बसविले होते. सदरील गॅरेज महामार्गालगत असून रविवारी मध्यरात्री नंतर अज्ञात चोरटयानी ट्रकचे पुढील दोन्ही टायर डिस्कसह चोरुन नेले. ही घटना गॅरेजचे मालक संतोष राठोड यांना सकाळी समजल्याने त्यांनी फोन करुन हजारे यांना सांगितले. त्यावरुन मनेशसिंग हजारे यांनी पोलिसात धाव घेतली आहे.