चौसाळा, दि. 19 : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट 2020 च्या परीक्षेचा निकाल दि\ 16 ऑक्टोंबरला लागला. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील चि. आकाश संतोष जोगदंड याने नीट परीक्षेत 720 पैकी 603 गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.