उस्मानाबाद, दि. 19 : भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना सोलापुर-धुळे महामार्गावरील बोरी ता. तुळजापूर शिवारातील कावलदरा वळणार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले आहे. 

राजेश कुमार (रा. नंदपुरीगाव, उत्तरप्रदेश) असे अपघातात जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. सोलापुर-धुळे महामार्गावरील बोरी ता. तुळजापुर जवळील कावलदरा वळणावर उस्मानाबादच्या दिशेने मोटरसायकलचे स्पेअर पार्ट घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक  RJ 14 GG 9297)  चा समोरून ट्रॅक्टर आल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटला. यात ट्रक पलटी होवून चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकचे नुकसान झाले आहे.


 
Top