नळदुर्ग, दि. 30 : विश्व हिंदू परिषदेचे नेते भुजंगराव घुगे यांचे निधन झाल्यानंतर सोमवार दि.२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी ऐतिहासिक चावडी चौक येथे  श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, जय हिंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय बताले, आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संतोष पोतदार यांनी भुजंगराव घुगे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.

यावेळी मुकूंद नाईक, भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, संजय विठ्ठल जाधव, धिमाजी घुगे, शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थानचे गजानन कुलकर्णी, विलास येडगे, तानाजी जाधव, भगवंत सुरवसे, नेताजी महाबोले,  संजय पोतदार, सुनील गव्हाणे,  यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top