जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील केंद्र शाळा होर्टी येथे नवोदय विद्यालय प्रवेश शासकीय विद्यानिकेतन, औरंगाबाद निवड व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू राहावा म्हणून शिक्षकांनी स्वनिर्मित व स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी चे सेवानिवृत्त प्राचार्य गोरखनाथ घोडके, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष मोरे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, सरपंच शिनाप्पा गुंजीटे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डी. डी. कदम, उपाध्यक्ष निळकंठ इटकरी, केंद्रप्रमुख अरुण अंगुले, समिती सदस्य ज्ञानेश्वर राजमाने, सिद्धेश्वर राजमाने, बळीराम भोसले, विजयानंद टिकांबरे, ज्ञानेश्वर पांचाळ, बालाजी घोडके आदी उपस्थित होते.
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानंतर केंद्रप्रमुख अरुण अंगुले यांनी प्रास्ताविकात शिक्षकांनी स्वखर्चातून व स्वनिर्मितीतून स्वाध्याय पुस्तिका तयार करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे प्रयोजन सांगितले. शाळेच्या गुणवत्तेचा चढता आलेख, नवोदय शिष्यवृत्तीधारक व विद्यानिकेतन प्रवेश यामुळे शाळेच्या वैभवात भर पडली आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
शिवतेज बालाजी माळी, शिवम माणिक गजले, श्रद्धा सुरेश राजमाने, गीता राजेंद्र देशमाने, अपूर्व संतोष कणसे, प्राप्ती तानाजी भोसले, निखिल बिराप्पा घोडके या गुणवंतांचा गोरखनाथ घोडके आदी मान्यवरांनी विशेष भेटवस्तू देऊन गौरव केला. ऑनलाइन भाषण स्पर्धेत विजेता ठरलेल्या दिग्विजय दिलीप कुलकर्णी याचाही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गुरूजींचेही कौतुक केले.मान्यवरांनी शाळेविषयी गौरवोद्गार काढले व वृक्षारोपण व संवर्धनासाठी ग्रामस्थ व शिक्षकांनी करत असलेले कार्य अलौकिक आहे.असे गोरखनाथ घोडके यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अरुण अंगुले, बसवराज माशाळकर, व्यंकट कोळी, नितीन रामणबैनवाड, विजयकुमार चव्हाण, विजयकुमार कदम, बालाजी माळी, मारूती कोरे, हरिभाऊ कळबंडे, बाबूराव चव्हाण, सचिन सगर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी माळी तर आभार प्रदर्शन बसवराज माशाळकर यांनी केले.