नळदुर्ग : एस.के. गायकवाड

लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील एक खंबीर आणि बुध्दीजिवी नेतृत्व केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान याना  नळदुर्ग ता.तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) सह विविध पक्ष,संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी वराडे  गुरुजी म्हणाले की, देशपातळीवर सर्वाधिक मतानी लोकसभेत निवडून जाण्याचा विक्रम करणारे आणि सतत केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री म्हणून सत्तेत राहणारे लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांच्या दु:खद निधनाने बहुजन समाजातील एक बुद्धीजीवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाले. अशा भावपूर्ण शब्दात  त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,रिपाइं बंजारा आघाडीचे जिल्हा आध्यक्ष आनंद चव्हाण,नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, उत्तम बनसोडे, आण्णाराव बनसोडे, जेष्ठ कार्यकर्त्ये शिवाय भोसले, विलास गायकवाड,शिवाजी वराडे ,बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top