अणदूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला असून यात अणदूर केंद्रातील अनेक शाळांनी चांगले यश मिळवले आहे.श्री श्री गुरुकुल मागील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

श्री श्री गुरुकुल व रविशंकर विद्यामंदिरमधील इयत्ता आठवीतील ४ विद्यार्थी तर पाचवी मधील १६ विद्यार्थी पात्र झाले आहेत. आठवी मधून राजवर्धन काळे,नागेश पांचाळ,घनश्याम मोरखंडीकर,आश्लेषा पाटील हे पात्र झाले आहेत तर पाचवीमधून ओम सूत्रावे, अभिनव मोकाशे,प्रणौती जत्ते, ओंकार हांडे, सार्थक ढाले, कृणाल कदम,सिद्धी सूत्रावे,शुभांगी ढाले,ऋग्वेद ढेपे,आनंद सोनवणे,वेदांत पोटे,भाग्यश्री कुंभार, श्रवण कदम,आरती लकडे,श्रावणी अवचार, राठोड अभिजित या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,सचिव डॉ नागनाथ कुंभार, संचालिका डॉ रुपाली कानडे,गुरुकुलच्या मुख्याध्यापिका पुष्पा लामतुरे ,रविशंकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना भाग्यश्री गोरे,सुरेश गायकवाड, संतोष मोकाशे, सागर नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 
Top