नळदुर्ग : सचिन गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, चिकुंद्रा, जळकोट ,वागदरी सह परिसरात हस्त नक्षत्रातील शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ११ ऑक्टोबर रोजी विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाटा सह पावसाने जोरदार हजेरी लावली. चिकुंद्रा येथील शेतकरी लक्ष्मण रंगराव गायकवाड यांचा दोन एकर ऊस परतीच्या पावसामुळे भुईसपाट झाला आहे. चिकुंद्रा गावातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाल्याने उसाचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाळ्यातील परतीचा पाऊस आणि महत्त्वाचे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र होय. या नक्षत्रातील गेली 10-11 दिवस कोरडीच गेली. त्यचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांनी काढणीला आलेले सोयाबीन पिक काढून घेतले. सोयाबीन पिक काढणी अंतिम टप्प्यात आली असताना बळीराजा रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, सह अन्य पिक पेरणीच्या तयारीत असताना जमीनीची ओल कमी झाल्याने थोडे फार चिंताग्रस्त झालेला होता. परंतु दि.११आँक्टोबंर रोजी दुपारी ठिक १२.३० वाजल्यापासून अचानकपणे आकाशात ढगांची जमवाजमव सुरू झाली आणि एक दिड वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि जोरदार पाऊसास सुरुवात झाली. तब्बल एक दीड तास पावसाने झोडपले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिक पेरणीला दिलासा मिळाला आहे.
