तुळजापुर : कुमार नाईकवाडी

कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर गेल्या सात माहिन्यापासुन बंद असल्यामुळे शहरातील व्यापारी, पुजारी व सर्व समाजातील जनता ही आई तुळजाभवानी  मातेच्या मंदिरावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून  आहे.  म्हणून श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडण्यासाठी तुळजापूर शहरातील व्यापारी,  पुजारी , महिलांचे, उपोषण आहे, तरी शहरातील सर्व नागरीकांनी महिलांनी उपस्थित राहावे, असे आव्हान करीत सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शहरातील बाजार पेठामध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने फेरी काढुन प्रसिद्धी पञके वाटण्यात आली.


यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील व्यापारी व नागरीकांना प्रसिद्धी पत्रके वाटली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक अभिजित कदम, आनंद कदंले, शिवाजी बोधले, सुहास सांळुके, गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब भोसले, उमेश गवते, बाळासाहेब श्यामराज आदीसह भा.ज.पा. कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top