नळदुर्ग, दि. 12 : रोहित दादा पवार विचार मंचच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी राज पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवाराच्यावतीने मंगळवार दि. 12 ऑक्टोबर रेाजी तुळजापुर येथे सत्कार करण्यात आला. 

संघटनेचे तुळजापुर तालुकाध्यक्ष श्रीधर नरवडे यांनी पवार यांना सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवणारे तसेच राज्यात नेतृत्व करणारे रोहित पवार यांनी त्यांच्या विचाराने ज्याप्रमाणे राज्यभर सामाजिक कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविले आहे. त्याचप्रमाणे विधायक कार्य उत्तमप्रकारे साकार करावे, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

सदरील निवड झाल्याबद्दल राज पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  रोहित पाटील, स्वप्नील मुळे, दत्ता सातपुते, ऋषीकेश रुपनर, संकेत पवार यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.

 
Top