अचलेर : जय गायकवाड
फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता पाचवी वर्गातून कुमारी.समृद्धी भालके व कुमारी. सौंदर्या कदारे तर इयत्ता आठवी वर्गातून कुमार.सोमेश्वर बिराजदार हे विद्यार्थी पात्र झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक बी.डी. बेंडगे, पर्यवेक्षक यु.पी. येरोळकर, फारुक जमादार, दिपक रुपणुर, सिध्दाराम भालके, सुनील ठेंगील, सोमनाथ धड्डे, मिनाक्षी कदारे, सौ. कांचन सुरवसे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
