कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. पण व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे. परंतु सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे अडचणीचे ठरत होते. ही समस्या सोडवण्यासाठी जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सामाजिक नियमाचे पालन करून, स्वखर्चाने स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळकोट बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जी.एन. सर्जे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख अरुण अंगुले, संजय माने, शा.व्य.स. सदस्य संजय अंगुले, हंगरगा (नळ) शाळेचे मुख्याध्यापक सी.बी. स्वामी व पालक उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक धनराज रेणुके यांनी केले तर आभार डी. एन. सोनवणे यांनी मानले.
