तुळजापूर : कुमार नाईकवाडी
उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस या ठिकाणी १९ वर्षीच्या तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला. यात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. "बेटी बचाव" वाल्यांच्या ढोंगी राम राज्यात एक बेटी बचाव असा आक्रोश करत तडफडुन एक तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेचा तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसव्यावतीने जाहीर निषेध करत उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करण्यात यावे, अशा मागणीचे एक लेखी निवेदन सोमवार दि. ५ रोजी राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी रा.काँ. चे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, धनंजय पाटील, खंडु जाधव, अशोक जाधव (मागासवर्गीस प्रदेश सदस्य), शहराध्यक्ष अमर चोपदार, मकसुद शेख, संदिप गंगणे, जिल्हा युवकचे उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा रा.काँ. सरचिटणीस शशी नवले, युवकचे शहराध्यक्ष शरद जगदाळे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष तौफिक शेख, व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, गणेश नन्नवरे, समर्थ पैलवान, अभय माने, रोहित चव्हाण, आकाश चोपदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
