तुळजापूर : कुमार नाईकवाडी

उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका मागासवर्गीय तरुणीवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दि. ५ आक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) च्या वतीने तुळजापूर तहसिलदार यांना निदर्शने आंदोलन करून देण्यात आले.

सदर प्रकरणी रिपाइंच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हाथरस जिल्ह्यातील तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदनीय घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत मुलीच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला विश्वासात न घेता बेरात्री तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करणाऱ्या संबंधित पोलीस आधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, कार्याध्यक्ष बाबसाहेब मस्के,विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम, तालुका सरचिटणीस केतन कदम, तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम, तुळजापूर युवा तालुका सरचिटणीस शुभम कदम,रिपाइंचे, बाळु शिंगे (वडार समाज अध्यक्ष), अरुण आप्पा कदम, राज कदम, प्रथ्वीराज कदम, हिरा भालेकर, बाळासाहेब कदम, संजय कदम, भोलानाथ कदम, योगेश सोनवणे, विजय गायकवाड, नाशिकेत कांबळे, तात्या हावळे,बाळु दुपारगुडे,हामीद बेग,भुजंग देवकुळे,शैलेश कदम सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top