मुरूम, दि. 16 : शंकरराव रानब्बा बिराजदार, राहणार सारणी, ता.औसा यांचे त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी (ता.१५) रात्री दुःखद निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
सारणी येथील एक प्रगतशील शेतकरी होते. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्यावरती शुक्रवारी (ता.१६) रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.दिनकर बिराजदार यांचे ते वडील होते.
