लोहारा, दि. 02 : उत्तरप्रदेश राज्यातील हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारने, पोलिसांनी आडवून त्यांना ताब्यात घेऊन, काँग्रेस कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी लोहारा (दि. २) लोहारा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी कॉंग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष के.डी. पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, माजी उपसरपंच नितिन पाटील, नगरसेवक आरिफ खानापुरे, मल्लीनाथ जट्टे, रमेश वैरागकर, विठ्ठल वचने-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
