चिवरी : राजगुरु साखरे

तुळजापूर तालुक्यातील  तीर्थ(खु) केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने तुळजापूर ग्रामीण बीटचे विस्तार अधिकारी कमलाकर धुरगुडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त तिर्थ(बु) येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी कमलाकर धुरगुडे यांनी पुढील आयुष्यात जिथे गरज पडेल तिथे अवश्य उपयोगी पडू अशी ग्वाही सर्व शिक्षक बंधूंना दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख तानाजी महाजन तर सुञसंचलन विशाल अंधारे यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख ऋषी भोसले, मुख्याध्यापक लक्ष्मण साखरे, जयश्री धुरगुडे, अमृता धुरगुडे, विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी प्रथमेश पाटील, संतोष माडजे, अनंत फुलसुंदर, श्रीहरी जमदाडे, विजयकुमार भालेकर, मोरे, दत्ताञय नलवाड, स्वाती खुणे, मनिषा क्षीरसागर यांच्यासह सहशिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top