नळदुर्ग, दि. 02 : किकोळ कारणावरुन चौघांनी महिला व तिच्या मुलाशी वाद घालुन लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण केल्याने एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना लोहगाव ता. तुळजापुर येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसात चौघांविरुध्द गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राम मनोहर सलगरे, रा. लोहगाव, ता. तुळजापूर हे त्यांच्या आईसह दि. 29.09.2020 रोजी 19.00 वा. सु. घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील मारुती फडतरे याच्यासह नळदुर्ग येथील आकाश घोडके, गजानन घोडके व अन्य एक व्यक्ती अशा चौघांनी राम सलगरे यांना, "तुझा भाऊ कुठे गेला. त्याला बघायचे का" असे म्हणुन राम व त्यांच्या आईसोबत वाद घालून शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी, लाकडी स्टम्पने मारहाण केली. या मारहाणीत राम यांच्या डोक्याची कवठी फॅक्चर झाली तर त्यांची आई किरकोळ जखमी झाली. अशा मजकुराच्या राम सलगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 01.10.2020 रोजी नोंदवला आहे.
