मुरूम, दि. २ : येथील शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ शहरातील शिवाजी चौक येथे शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळच्या सुमारास मोदी-योगी यांच्या प्रतिमेस जोडे मारून दहन करून शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी धरणे आंदोलन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केली. याच्या निषेधार्थ मुरुम शहरात काँग्रेसच्या वतीने  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शरणजी पाटील, योगेश राठोड, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, सालार कोतवाल, शंभुलिंग पाटील, रशिद शेख, सिध्दलिंग स्वामी, सहदेव गायकवाड, सुरेश शेळके, इब्राहिम नदाफ, बबनराव बनसोडे, गौस शेख, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, दादा बिराजदार, राजू मुल्ला, नाना बेंडकाळे, सुरज राजपूत, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, दिलीप गुंडगोळे, शिवपुत्र सोलापूरे, अशोक पाटील आदी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है ! यासह मोदी-योगी मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात येवून मुरुम पोलिस ठाण्यात सपोनि यशवंत बारवकर, पोउनि एस.एस.बिराजदार यांना कार्यकर्त्यांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.

 
Top