जालना, दि. 02 : बंजारा समाजातील राजकीय नेते, आजी माजी आमदार, मंत्री समाजाच्या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत व समाजातून वारंवार उठणा-या समाज भावनांची दखलही घेत नसल्याच्या निषेधार्थ समाजातील झोपी गेलेल्या नेत्यांना जागे करण्यासाठी बंजारा समाजाचे दि. २ रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त अहिंसक पद्धतीने एक दिवसीय आत्मक्लेष उपोषण संपन्न झाले.

एकदा निवडून आल्यावर पाच वर्ष झोप घेणा-या गोर बंजारा समाजातील लोकनेत्यांचे कार्य कुंभकर्णालाही लाजवणारे आहेत. कुंभकर्ण केवळ सहा महिने झोपायचा. हे बहादर तर पाच-पाच वर्ष झोपतात, असा संताप समाज बांधवातून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावावर निवडून येत आहेत आणि भविष्यातही निवडून येणार  यात तिळमात्र शंकाच नाही. पण ज्या वसंतराव नाईक साहेबांच्या  भरोशावर आपण निवडून येत आहोत त्या वसंतराव नाईकांचे सामाजिक कार्य समाजाच्या प्रगतीसाठी थोडेतरी समोर घेऊन जाण्याचे यांना का सुचत नाही? असा प्रश्न महाराष्ट्रातील समस्त गोर बंजारा समाजाला पडला आहे.  या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि समाजातील झोपी गेलेल्या नेत्यांना जागे  करण्यासाठी २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त अहिंसक पद्धतीने एक दिवसीय आत्मक्लेष उपोषण संपन्न झाले.

या साठी आप-आपल्या घरीच प्रा. फुलसिंग जाधव औरंगाबाद , प्रा. रविराज चव्हाण औरंगाबाद, राजेश चव्हाण जालना, डॉ. वसंत राठोड नांदेड, राजु पवार पाथर्डी, गोरखनाथ राठोड, रविंद्र राठोड नागपुर, डॉ. गणेश चव्हाण नागपुर, पी. टी. चव्हाण बीड, गजानन जाधव नागपुर, विष्णुपंत पवार, डॉ. विनय पवार नांदेड, जीवन चव्हाण औरंगाबाद, शिवाजी राठोड औरंगाबाद, बी. यु. राठोड औरंगाबाद, रमेश जाधव व संतोष चव्हाण गोरसेवा फॉंडेशन, विठ्ठल पवार पाथर्डी, विठ्ठल राठोड यवतमाळ, गजानन जाधव मुंबई, अशोक राठोड औरंगाबाद, सौ. विद्या चव्हाण मुंबई, प्रा. वसंत चव्हाण मंगरुळपिर, भिमणीपुञ मोहन नाईक चिंचखेडा, आत्माराम जाधव जळगाव, डॉ. प्रियंका राठोड रत्नागिरी व  महाराष्ट्र राज्यातील अनेक बंजारा बांधवांनी या आत्मक्लेष उपोषणात सहभाग नोंदवला.

 
Top