तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदीमाया शक्ती असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शारदीय नवराञ महोत्सवाच्या पुर्व संध्येला व अधिक मास दिनाचे औचिवत्य दि. ६ मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात श्री देवी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. 

यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव भाविकाविना होणार असल्यामुळे भाविक श्री क्षेञ तुळजाभवानी मातेच्या दरबारातील राजमाता जिजामाता महाद्वार बाहेरून कळस दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार यथा सांग पुजा करत आहे. तसेच सुतकातील माळ परडी (जुनी) ठेवून नविन माळ परडी व भोगी पुजा करुन घटस्थापनेसाठी श्रीफळ (नारळ) घेऊन माथा टेकऊन जात आहेत.

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने मंगळवारी तुळजापुरात दाखल झाले होते. तुळजापुर शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. तसेच शहरातील भवानी रोडवर व शहराबाहेर भाविकांच्या चार चाकी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शहरातील मंदीर परिसर, भवानी रोड, शुक्रवार पेठ, मेन रोड, कमानवेस रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलुन गेले होते. 

शारदीय नवरात्रापुर्वी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने मंदीरातील स्वच्छता सँनिटायझर फवारणी करुन मंदीर स्वच्छ ठेवण्यासाठी सोमवारीच राजे शहाजी महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार बंद केले होते. मंगळवारी श्री देवी भक्तांनी शहरातील बाजार पेठा मध्ये माळ परडी व प्रासादिक साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.



 
Top