काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथे असणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेकडून दत्तक असणाऱ्या सांगवी (काटी), माळुंब्रा, पांगरधरवाडी सुरतगाव,पिंपळा, गोंधळवाडी, खडकी, सात गावातील 296 शेतकऱ्यांना पावणे तीन कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले . कोरोणाच्या महामारीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना आधार म्हणून सांगवी (काटी) महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी विश्वास पवार यांनी  गेल्या दोन महिन्यात सुट्टीच्या दिवशी व रात्री उशिरापर्यंत थांबून शेतकऱ्यांना पावणेतीन कोटी रुपयेचे कर्ज वाटप केले. 2019/20  मध्ये 56 शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते व त्या सर्व शेतकऱ्यांनी शंभर टक्के कर्ज नूतनीकरण करून घेतले.

या शाखेचे शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे द्वितीय वर्ष असून या वर्षांमध्ये 240 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना अटल पेन्शन योजना, पी .एम. किसान योजना, केंद्र सरकारच्या योजना, पंतप्रधान जीवन ज्योति बीमा योजना, अशा सर्व योजनेची माहिती शेतकऱ्यांना बँकेमार्फत वेळोवेळी परिसरातील शेतकऱ्यांना सांगण्यात येते.

आख्खा देश कोरोना महामारी च्या संकटा मध्ये सापडला असताना शेतकरीही अडचणीत होता अशा वेळी बँकेचे शाखा अधिकारी विश्वास पवार यांनी गेल्या दोन महिन्यापासून सुट्टीच्या दिवशीही व रात्री उशीरापर्यंत थांबुन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. 

- शेतकरी रामदास मगर.

तीन कर्मचाऱ्यांचे नियोजन 

या शाखेमध्ये एक शाखा व्यवस्थापक व दोन कर्मचारी असे तीन कर्मचारी कार्यरत आहेत कोरोना महामारी च्या काळात सुद्धा योग्य नियोजन व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून बँकेसमोर गर्दी न होऊ देता कर्जास पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. कर्मचारी अभावी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांसाठी ही एक शाखा उत्तम उदाहरण आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे हे द्वितीय वर्ष आहे. 2019 20 मध्ये 56 शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण केले आहे चालू वर्षे 240 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे तरी गेल्या वर्षी प्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी हे पीक कर्ज नूतनीकरण करावे. आज माझा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

 -  विश्वास पवार, शाखाधिकारी

 
Top