नळदुर्ग, दि. 06 : शहरात असलेल्या महामार्गावरील दुभाजकामध्ये पथदिवे बसविणे, हाइमास्ट लैंप, रिफ्लेक्टर साईन बोर्ड, आवश्यक तेथे गतिरोधक व रंबलर स्ट्रीप करणे, सर्विसरोड व महामार्गावरील सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा, वृक्षारोपण व हिरवळ निर्माण करावेत, या प्रमुख मागण्यासाठी नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग तूळजापुर-अक्कलकोट ,सोलापुर विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कड़े निवेदनाद्वारे मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत टीम लीडर महेंद्रसिंग, तिवारी व त्यांच्या टीम ने आज मनसेच्या पदाधिका-याची प्रत्यक्ष भेट घेऊन लवकरच गोलाई ते बसस्थानक पर्यंत हायमास्ट लॅम्प सह, स्ट्रीट लाईट, साईन बोर्ड, रंबलर स्ट्रीप, गतिरोधक व ट्री प्लानटींग करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
नळदुर्ग येथे होत असलेल्या महामार्गावर दुभाजकामध्ये पथदिवे बसवावेत व हिरवळ करून सुशोभित करावे, नळदुर्ग गोलाई चौक, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोरील चौक, रामलीला नगर समोरिल चौक व बस स्थानक समोरिल प्रमुख चौकात हाइमास्ट लैंप उभे करावेत, तसेच आवश्यक तेथे गतिरोधक व रंबलर स्ट्रीप करावे, रिफ्लेक्टर साईन बोर्ड बसवावेत, सर्विस रोड व महामार्ग करताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागेत बगीचा, वृक्षारोपण, व हिरवळ निर्माण करावी आदि मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर दरवर्षी तूळजापूरला महाराष्ट्रसह, आंध्र, तेलंगाणा, कर्नाटक आदी राज्यातून लाखो भाविक पायी चालत जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी व शहरातील नागरिकांना ये-हा करण्यासाठी बॅरिगेट बसवावे अशी, मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी केली होती. तसेच यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिटकरी, महामार्ग सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी, टीम लीडर महेंद्रसिंग तिवारी यांच्याशी सातत्याने संपर्क करून सदर विषयांवर चर्चा करून तातडीने हे कामे करावेत असा पाठपुरावा केला. त्यास अखेर यश मिळाले असून लवकरच गोलाई ते बस स्थानक पर्यंत हायमास्ट लॅम्पसह, स्ट्रीट लाईट, साईन बोर्ड, रंबलर स्ट्रीप, गतिरोधक, व ट्री प्लानटींग करण्यात येणार आहे, अशी माहिती टीम लीडर महेंद्रसिंग, तिवारी व त्यांच्या टीम ने आज मनसेच्या पदाधिका-याची प्रत्यक्ष भेट घेऊन दिली.
यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके यांच्या महामार्ग संबंधित अधिकारी, इंजिनिअर, टीम लीडर सह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
